📅 12 October 2026, Monday
👤 एडिटर लॉगिन ✉️ संपर्क
सांस्कृतिक

स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानला ‘संपदा समाजकल्याण पुरस्कार २०२६’ प्रदान

पुणे : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानला ‘संपदा समाजकल्याण पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. संपदा सहकारी बँक लि., पुणे यांच्या वतीने रविवार, ११ ऑक्टोबर रोजी एस. पी. महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपयांची रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असे होते.

या कार्यक्रमाला प्रसिद्ध उद्योजक डॉ. प्रकाश धोका प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर डॉ. प्रवीण दबडघाव प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे हा पुरस्कार स्वीकारला.स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, किशोरवयीन विकास आणि सामाजिक सक्षमीकरण या क्षेत्रांत विविध उपक्रम राबविले जातात. समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्या उन्नतीसाठी संस्थेकडून करण्यात येणाऱ्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारामुळे संस्थेच्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन मिळाले असून, भविष्यात अधिक जबाबदारीने आणि समर्पित भावनेने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करण्यात आली. संस्थेच्या कार्यात योगदान देणारे विश्वस्त, पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, स्वयंसेवक, देणगीदार आणि हितचिंतक यांच्या योगदानाचाही हा सन्मान असल्याचे संस्थेने नमूद केले.



या पुरस्काराबद्दल स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने संपदा सहकारी बँक लि., पुणे यांचे आभार मानण्यात आले.

संबंधित बातम्या

नऱ्हे परिसरात १०० कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून ८७ लाख ६१ हजाराची फसवणूक

नऱ्हेतील घरफोडीचा गुन्हा उघड; तिघांना अटक

डीजे-डॉल्बीच्या आवाजावर मुंबई उच्च न्यायालयाचा बडगा

नऱ्हे नंदनवन सिटीतील रिंग रोडच्या मोजणीला स्थानिकांचा विरोध