📅 04 November 2026, Wednesday
👤 एडिटर लॉगिन ✉️ संपर्क
शिक्षण

काळी आई वाचवा, तरच पुढची पिढी टिकेल!

पुणे,नऱ्हे: मातीचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. काळी आई आपल्याला अन्न देते. त्यामुळे तिचे संवर्धन करणे आवश्यक आहे. प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त भाजी पोहोचली पाहिजे. आरोग्याला पोषक अन्न खाण्यावर भर द्यावा. काळी आई वाचवली, तरच पुढची पिढी टिकेल, असे आवाहन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले.

नऱ्हे-मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ संपादक विजय बाविस्कर, संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

न-हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् च्या १३ व्या वर्धापनदिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवर व पुरस्कारार्थी.
न-हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् च्या १३ व्या वर्धापनदिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवर व पुरस्कारार्थी.


या सोहळ्यात माजी खासदार व समाजसेवक प्रा. जोगेंद्र कवाडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृषी क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री राहीबाई पोपेरे, शैक्षणिक क्षेत्रासाठी औदुंबर उकिरडे, कला क्षेत्रासाठी अभिनेते मिलिंद शिंदे, सहकार क्षेत्रासाठी निलेश ढमढेरे आणि सामाजिक क्षेत्रासाठी जयंत हिरे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुणेरी पगडी, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी संकटांवर मात करण्यासाठी शिस्त, समर्पण आणि दृढनिश्चय आवश्यक असल्याचे सांगितले. शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असून, विद्यार्थ्यांना घडविण्याची जबाबदारी महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.

औदुंबर उकिरडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. सहकारी बँकांच्या माध्यमातून नागरिकांच्या आर्थिक गरजा भागविण्यासह त्यांना प्रगतीच्या संधी मिळतात, असे निलेश ढमढेरे यांनी नमूद केले. समाजसेवा म्हणजे केवळ मदत करणे नव्हे, तर लोकांच्या जीवनात आशा निर्माण करणे होय, असे जयंत हिरे म्हणाले.

ॲड. शार्दुल जाधवर यांनी संस्थेच्या तेरा वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर संस्थेचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अग्निशमन दल, पोलीस, पत्रकार, सैन्यदल आणि रुग्णवाहिका चालकांच्या मुलांना केजी ते पीजीपर्यंतच्या शैक्षणिक शुल्कात २५ टक्के सवलत देण्याबाबतची, तसेच ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून संस्थेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १५ टक्के शैक्षणिक शुल्क सवलतीची शिष्यवृत्तीपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

संबंधित बातम्या

‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न’ पुरस्कार सोहळा रविवारी; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार गौरव

गणेशोत्सवात रेनबो स्कूलचा अनोखा उपक्रम

नऱ्हेतील अंगणवाडीला मिळणार नवे रूप

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे प्रभावी नियोजन कसे करावे?