पुणे : शिक्षण, सामाजिक कार्य, उद्योग, कृषी, बँकिंग, प्रशासन यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ग्रीन वर्ल्ड आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न’ तसेच ‘आयकॉनिक लीडर ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी नऱ्हे येथील ॲड. शार्दुलराव सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल क्रमांक २ येथे हा सोहळा होणार आहे.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर आणि आयोजक व लेखक गौतम कोतवाल यांनी या पुरस्कार सोहळ्याची माहिती दिली. ‘गौरव कर्तृत्वाचा’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत आपल्या कार्यातून योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
तीन सत्रांमध्ये होणार पुरस्कार वितरण...
गणेशोत्सवात रेनबो स्कूलचा अनोखा उपक्रमशिक्षण · 6 दिवसांपूर्वी
नऱ्हेतील अंगणवाडीला मिळणार नवे रूपशिक्षण · 6 दिवसांपूर्वीया पुरस्कार सोहळ्याचे तीन स्वतंत्र सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या सत्राला सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे. मंत्रालय सचिव विकास देशमुख, ऊर्जा कुतवळ फूड प्रॉडक्ट्सचे प्रकाश कुतवळ, प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर आणि माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
या सत्रात नवनाथ ढवळे, जयश्री पलांडे आणि डॉ. शिवाजीराव पोखरकर यांना ‘ग्रीन वर्ल्ड, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच विजय कोद्रे आणि अनिल तुपे यांना ‘आयकॉनिक लीडर ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
दुसऱ्या सत्रात शिक्षण व नेतृत्व क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव...
दुपारी १.३० वाजता दुसरे सत्र होणार आहे. या कार्यक्रमाला जमाबंदी व संचालक भूमी अभिलेख अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर खिलारे, कृषी उद्योजक व कृषी आणि कृषी संलग्न अभ्यासाचे प्रसारक उदय बोरावके, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या सत्रात श्रीरामपूर रयत शैक्षणिक संकुलाच्या प्रमुख मीना जगधने यांना ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
तर अभिजित भुजबळ, अशोक जाधव आणि सुधीर मुंगसे यांना ‘आयकॉनिक लीडर ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
सायंकाळच्या सत्रातही पुरस्कार वितरण...
पुरस्कार सोहळ्याचे तिसरे सत्र सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या सत्रात इन्कमटॅक्स कमिशनर आयआरएस अजय केसरी, माधुरी सोलरचे चेअरमन संजय देशमुख आणि नगरसेविका निवेदिता एकबोटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
या सत्रात श्रीधर गायकवाड, डॉ. नुसरत गुलझार आणि उमेश पवार यांना ‘आयकॉनिक लीडर ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच मिलिंद शहा आणि डॉ. कैलास चौधरी यांना ‘ग्रीन वर्ल्ड, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रांतील कर्तृत्वाचा गौरव.......
शिक्षण आणि सामाजिक क्षेत्राबरोबरच उद्योग, कृषी, बँकिंग, प्रशासन आणि अन्य क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ‘गौरव कर्तृत्वाचा’ या संकल्पनेतून विविध क्षेत्रांतील कार्याची समाजासमोर नोंद व्हावी, या उद्देशाने मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
रविवार, २७ सप्टेंबर रोजी नऱ्हे येथील ॲड. शार्दुलराव सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल क्रमांक २ येथे होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यास पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




