📅 04 November 2026, Wednesday
👤 एडिटर लॉगिन ✉️ संपर्क
महाराष्ट्र

लोकशाहीच्या रक्षणासाठी पुण्यात मोर्चा

पुणे : देशाची एकता, अखंडता आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासह समाजात अराजकता निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘मी भारत प्रेमी’ संघटनेच्या वतीने शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) पुण्यात पायी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता छत्रपती संभाजी उद्यान येथून सुरू झालेला मोर्चा डेक्कन जिमखाना येथे पोहोचला. या मोर्चामध्ये प्रसिद्ध सिनेअभिनेते नितीश भारद्वाज सहभागी झाले होते. 

त्यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करत लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.यावेळी बोलताना नितीश भारद्वाज यांनी लोकशाही आणि संविधानाला आव्हान देणाऱ्या फुटीरतावादी शक्तींना रोखण्याची गरज व्यक्त केली. सीजेपी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि नेहा बोरा यांच्यासारख्या व्यक्तींनी विनाकारण अराजकता निर्माण करून सामान्य नागरिकांना त्रास देऊ नये, असे मत त्यांनी मांडले. अशा प्रवृत्तींना सज्जनशक्ती अधिक ताकदीने प्रत्युत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मोर्चामध्ये  उपस्थित नागरिकांना  संबोधित करताना प्रसिद्ध सिनेअभिनेते नितीश भारद्वाज
मोर्चामध्ये उपस्थित नागरिकांना संबोधित करताना प्रसिद्ध सिनेअभिनेते नितीश भारद्वाज

लोकशाहीची मूल्ये जपणे आणि संविधानाचे संरक्षण करणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. देशाची एकता, अखंडता आणि सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक राहणे आवश्यक आहे. लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास दृढ ठेवत संविधानिक मूल्यांच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे, असे आवाहन भारद्वाज यांनी केले.

‘माझा देश, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात विविध क्षेत्रांतील नागरिक, युवक आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी सहभाग नोंदविला. ‘अराजकतेला नकार, लोकशाहीला समर्थन!’ या घोषवाक्याखाली आयोजित या मोर्चातून राष्ट्रीय एकात्मता आणि लोकशाही व्यवस्थेच्या समर्थनार्थ जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिकाला आपले प्रश्न, समस्या आणि मते शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने मांडण्याचा अधिकार आहे. मतभेद व्यक्त करणे हा लोकशाहीचा अविभाज्य भाग असला, तरी मतभेद व्यक्त करताना कायद्याचा आदर, सामाजिक सलोखा आणि शांतता राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. लोकशाही मार्गाने प्रश्न मांडण्याऐवजी अराजकतेला प्रोत्साहन देणे, सार्वजनिक संस्थांबाबत बिनबुडाचे आरोप करून समाजात अविश्वास निर्माण करणे आणि सामाजिक एकात्मतेला बाधा पोहोचविणाऱ्या प्रवृत्तींविरोधात नागरिकांनी जागरूक राहावे, अशी भूमिका आयोजकांनी मांडली.

राष्ट्रहिताला प्राधान्य देत देशाची एकता व अखंडता टिकविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि संविधानाचा सन्मान राखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन ‘मी भारत प्रेमी’च्या वतीने करण्यात आले.

मतभेद असणे हा लोकशाहीचा अविभाज्य भाग असला, तरी ते व्यक्त करताना शांतता, कायद्याचा आदर आणि सामाजिक जबाबदारी जपली पाहिजे. राष्ट्रहिताला प्राधान्य देत लोकशाही मूल्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन ‘मी भारत प्रेमी’च्या वतीने करण्यात आले.



संबंधित बातम्या

'नटसम्राट’ नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचा पेच आणि संविधानिक प्रक्रियेमुळे राज्य सरकारसमोर मर्यादा

मुख्यमंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व पुणे विभागाची संयुक्त बैठक