बीड : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या नागरिकांना हृदयरोगाची तपासणी व उपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जैन सोशल फेडरेशन, अहमदनगर संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल, बीड यांच्या वतीने विशेष हृदयरोग तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जालना रोड, शाहू बँकेजवळील आनंदऋषीजी डायग्नोस्टिक सेंटर येथे होणार आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसमोरील आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे काही नागरिकांकडून आरोग्य तपासणी किंवा उपचार पुढे ढकलले जातात. ही बाब लक्षात घेऊन आर्थिक अडचणींमुळे आवश्यक हृदयरोग उपचारांपासून नागरिक वंचित राहू नयेत, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. अमित भराडिया यांची विशेष उपस्थिती
या शिबिरात बीडचे भूमिपुत्र आणि DNB (Cardiology) हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अमित भराडिया नागरिकांची तपासणी करणार आहेत. तपासणीनंतर रुग्णांच्या आरोग्यस्थितीनुसार पुढील उपचार आणि आवश्यक वैद्यकीय प्रक्रियांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
डॉ. अमित भराडिया यांची विशेष उपस्थितीविशेष दरात विविध तपासण्या
शिबिरात हृदयरोग तज्ज्ञांची OPD तपासणी व वैद्यकीय सल्ला ₹२०० मध्ये उपलब्ध राहणार आहे. OPD सोबत ECG मोफत करण्यात येणार आहे. तसेच 2D Echo ₹९०० आणि अँजिओग्राफी ₹३,००० या विशेष दरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पात्र रुग्णांना योजनेंतर्गत उपचार
हृदयरोगाचे निदान झाल्यानंतर आवश्यकतेनुसार पुढील उपचारांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. MJPJAY आणि PMJAY अंतर्गत पात्र रुग्णांना संबंधित योजनेच्या नियम व निकषांनुसार अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी तसेच आवश्यक हृदयविषयक उपचार व शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध होऊ शकतात.
'नटसम्राट’ नाना पाटेकर काळाच्या पडद्याआडमहाराष्ट्र · 1 दिवसांपूर्वी
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचा पेच आणि संविधानिक प्रक्रियेमुळे राज्य सरकारसमोर मर्यादामहाराष्ट्र · 1 दिवसांपूर्वी
मुख्यमंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावरमहाराष्ट्र · 24 Sep 2026यामुळे आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना उपचारासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय आरोग्य योजनांचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.
हृदयरोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन
छातीत दुखणे किंवा जडपणा जाणवणे, दम लागणे, जास्त घाम येणे, चक्कर येणे, हृदयाची धडधड वाढणे यांसारखी लक्षणे जाणवत असल्यास नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
महिन्यातून दोनदा तज्ज्ञांची सेवा
बीडकर नागरिकांच्या सोयीसाठी डॉ. अमित भराडिया यांची हृदयरोग तपासणी व मार्गदर्शन सेवा दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.बीड शहरासह परिसरातील नागरिकांनी ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.




