📅 21 September 2026, Monday
👤 एडिटर लॉगिन ✉️ संपर्क
पुणे

धायरी येथील 'शिववंदना मित्र परिवारा'तर्फे कसबा गणपती दर्शन व शिव-शंभू वंदनेचा उत्साही कार्यक्रम संपन्न!

पुणे: धायरी येथील 'शिववंदना मित्र परिवार' यांच्या वतीने नुकताच मनाचा पहिला 'कसबा गणपती' दर्शन, शिववंदना आणि शंभू वंदनेचा अत्यंत उत्साही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या विशेष उपक्रमात तब्बल १९० विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या उत्सहात सहभाग घेतला.


कार्यक्रमाची सुरुवात मुलांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध व लयबद्ध शिववंदना आणि शंभू वंदनेने झाली. यावेळी उपस्थित गणेश भक्तांचा आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लहान मुलांच्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराज्यांच्या पराक्रमाची महती ऐकून संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. त्यानंतर बाप्पाची महाआरती करून या प्रेरणादायी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


यावेळी बोलताना प्राज भिलारे म्हणाले, " आजच्या पिढीला आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची ओळख व्हावी, या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनाचा पहिला कसबा गणपतीची निर्मिती कोणी आणि कशासाठी केली, यामागचा सविस्तर इतिहास मुलांना कळावा व त्यांच्यात शिवप्रेम रुजावे, हा यामागील मुख्य उद्देश होता."

यावेळी श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जी शेटे, नीलेश वकील, ऋग्वेद निरगुडकर आदी उपस्थित होते

संबंधित बातम्या

गरजू रुग्णांसाठी ‘वैद्यकीय मदत कक्षा’ची स्थापना

स्वामीनारायण लँडमार्कचा पहिलाच गणेशोत्सव उत्साहात साजरा

पुण्यातील पावसाळी पर्यटन: भेट देण्यासारखी ५ सुंदर ठिकाणे