पुणे, प्रतिनिधी : पुण्यातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीचा वाढलेला कालावधी आणि शहरातील प्रमुख रस्त्यांवरील गर्दीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आणि पुणे महानगरपालिकेकडून यंदा मिरवणुकीच्या नियोजनात बदल करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांत विशेष परवानगीद्वारे मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर सहभागी करून घेतलेल्या सुमारे १५० गणेश मंडळांना यंदा प्रवेश देण्यात येणार नसल्याचे पोलिसांकडून कळविण्यात आले आहे.
शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, बिबवेवाडी यांसह शहरातील विविध भागांतील संबंधित गणेश मंडळांना याबाबत परिमंडळ-१ चे पोलीस उपआयुक्त ऋषिकेश रावले यांनी पत्र पाठविले आहे. गेल्या दोन वर्षांत विशेष परवानगीच्या माध्यमातून मुख्य मिरवणुकीत सहभागी झालेल्या या मंडळांना यंदा मुख्य मार्गावर प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती पत्राद्वारे देण्यात आली आहे.
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा कालावधी गेल्या काही वर्षांत वाढला असून, तो साधारण ३० ते ३४ तासांपर्यंत जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. मिरवणुकीदरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर मुख्य मिरवणुकीतील मंडळांची संख्या आणि मिरवणुकीचा कालावधी याबाबत नियोजन करण्यात आले आहे.
पारमार्थिक सेवा प्रतिष्ठानचा तृतीय वर्धापन दिन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्नपुणे · 16 तासांपूर्वी
सिंहगड पत्रकार संघ डिजिटल मीडियाची नवीन कार्यकारिणी जाहीरपुणे · 1 दिवसांपूर्वी
मानवी हक्क आयोगाच्या आदेशाने पुणे पोलिसांवर गंभीरप्रश्नचिन्हपुणे · 4 दिवसांपूर्वीगेल्या दोन वर्षांत विशेष परवानगी देण्यात आलेल्या मंडळांचा यंदा मुख्य मिरवणुकीतील सहभाग नाकारण्यात आल्याने संबंधित मंडळांना स्थानिक पातळीवर विसर्जनाची व्यवस्था करावी लागणार आहे.
मुख्य विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक नियमन, बंदोबस्त आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता पोलिसांकडून दरवर्षी विविध उपाययोजना केल्या जातात. यंदाच्या निर्णयामुळे मुख्य मिरवणुकीतील सहभागी मंडळांची संख्या कमी होऊन मिरवणुकीचा कालावधी कमी होतो का, याकडे लक्ष लागले आहे.




