पुणे : ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीचे पत्रकार श्री. निखिल सुक्रे यांच्यावरील कथित मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ सिंहगड पत्रकार संघाच्या वतीने नऱ्हे पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून घटनेतील संबंधितांची चौकशी करावी तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
पत्रकारांना वृत्तांकन करताना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. बातमी संकलन व वृत्तांकनाच्या प्रक्रियेत पत्रकारांवर दबाव अथवा हल्ल्याच्या घटना घडल्यास त्याचा परिणाम निर्भय पत्रकारितेवर होऊ शकतो. त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा घटनांची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक असल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनादरम्यान नमूद केले.
सिंहगड पत्रकार संघाच्या प्रतिनिधींनी नऱ्हे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. वर्षा देशमुख यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणाबाबत निवेदन सादर केले. या घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करून उपलब्ध पुरावे व संबंधित व्यक्तींच्या जबाबांच्या आधारे कायदेशीर प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच पत्रकारांना आपले कर्तव्य बजावताना सुरक्षित वातावरण मिळणे गरजेचे असून, पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये कायद्याच्या चौकटीत योग्य ती कारवाई व्हावी, अशी भूमिका सिंहगड पत्रकार संघाने व्यक्त केली.
नवले चौक ते वडगाव बुद्रुक परिसरातील वाहतूक प्रश्नांवर संयुक्त पाहणी; १५ दिवसांत कार्यवाहीची मागणीपुणे · 1 दिवसांपूर्वी
सिंहगड पत्रकार संघ डिजिटल मीडियाची नवीन कार्यकारिणी जाहीरपुणे · 6 दिवसांपूर्वी
मानवी हक्क आयोगाच्या आदेशाने पुणे पोलिसांवर गंभीरप्रश्नचिन्हपुणे · 24 Sep 2026पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आणि निर्भयपणे पत्रकारिता करण्याच्या अधिकारासाठी पत्रकार संघटना व पत्रकारांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणातील घटनेबाबत पोलिसांकडून करण्यात येणारी चौकशी आणि त्यानंतरची कायदेशीर कार्यवाही महत्त्वाची ठरणार आहे.




