📅 30 September 2026, Wednesday
👤 एडिटर लॉगिन ✉️ संपर्क
पुणे

पुण्यात बापटांना धक्का.

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला असून, गणेशोत्सवातील पाच दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यंत्रणा वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार १९, २०, २२, २३ आणि २५ सप्टेंबर या दिवशी रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपकांचा वापर करता येणार आहे. पुण्यात विद्यानंद बापट यांनी लाऊडस्पीकरला विरोध केला असला तरीही पोलिसांनी परवानगी दिल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. 


गणेशोत्सवातील वाढती गर्दी आणि विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर ध्वनिक्षेपक वापराबाबत पोलिस प्रशासनाकडून नियमावली निश्चित करण्यात आली आहे. या नियमांनुसार ध्वनिक्षेपक यंत्रणेत कमाल चार बेस आणि चार टॉप वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.


दरम्यान, ध्वनिक्षेपक वापरास रात्री १२ वाजेपर्यंत वेळेची सवलत असली तरी ध्वनीच्या निर्धारित मर्यादांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. पुणे जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास सहा दिवसांची वेळेची सवलत देण्यात आली आहे.


ध्वनिक्षेपक यंत्रणेत ‘प्रेशर मिड’ आणि ‘प्लाझ्मा साउंड’ यांसारख्या उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करून ध्वनियंत्रणा जप्त करण्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिल्याची माहिती आहे.


२५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून याच दिवशी गणेश विसर्जन होणार आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर ध्वनिक्षेपक वापराबाबतची ही वेळेची सवलत गणेश मंडळांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.


गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना ध्वनीमर्यादा, पोलिस प्रशासनाने निश्चित केलेली नियमावली तसेच इतर कायदेशीर सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

पुणे महानगरपालिका व महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुनवडी ते पुणे’ उपक्रम

पुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या मार्गात यंदा बदल.

नांदेड सिटीत रंगला स्व. निवृत्ती हगवणे पाटील स्मृती - रामराज्य जेष्ठ नागरिक कर्मयोगी सन्मान सोहळा

गरजू रुग्णांसाठी ‘वैद्यकीय मदत कक्षा’ची स्थापना